Weather forecast : पुढचे पाच दिवस या भागात अवकाळीचे सावट राहणार…

Weather forecast : पुढचे पाच दिवस या भागात अवकाळीचे सावट राहणार…

Weather forecast : कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असून विदर्भात उन्हाचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाने पुढचे पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पुढचे पाच दिवस विजासह आणि ढगांच्या गडगडाटी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवारी (31/मार्च) आणि मंगळवारी (01/एप्रिल) विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज तसेच जोरदार वारे वाहतील असे हवामान विभागाने सांगितले आहे. (Weather forecast)

धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पुढचे पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मात्र उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment

Close Visit agromedia24